जिल्ह्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट
सदस्य नोंदणी जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातून प्रत्येकी एक लाख सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पूर्ण जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सदस्य नोंदणी अभियान बाबत माहिती देण्यासाठी भाजपची पत्रकार परिषद आज जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस तथा अभियानाचे जिल्हा संयोजक रणजित देसाई, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष रुपेश कानडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात भाजपची सदस्य नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे. त्यानुसार खा नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ नितेश राणे, अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे.