आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून मंजूर बीएसएनएल टॉवर चे भूमिपूजन
देवगड (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून देवगड तालुक्यातील ओंबळ येथे बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. बीएसएनएल टॉवर लवकरच उभारण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील जनतेला आता मोबाईल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. या टॉवर साठी शरद पवार यांनी विनामोबदला आपली जमीन उपलब्ध करून दिली आहे.यावेळी सरपंच अरुण पवार, बंड्या नारकर राजू जठार, उदय पाटील, भालचंद्र पवार, शाम जाधव, अजित पवार, प्रवीण पवार, प्रकाश पालकर, चंद्रकांत मेस्त्री, मोहन पवार आदी उपस्थित होते. बीएसएनएल टॉवर मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणेंचे तसेच जागा विनामोबदला दिल्याबद्दल जमीनमालक शरद पवार यांचे आभार मानले.