बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू व बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा
ओरोस (प्रतिनिधी) : बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर तुम्ही आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा. बांगलादेशातील आपल्या देशात राहत असलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. येथून त्यांनी आपल्या देशात फोन करून ‘अरे काय करताय, आम्हाला उद्याचा दिवस दिसणार नाही वाटतो’, असे सांगितले पाहिजे. असे बांगलादेशी नागरिकांना इशारा देणारे भाषण आ नितेश राणे यांनी बांगलादेश हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत हिंदूंना संबोधित करताना केले.
बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार आणि त्यांचे होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी मानावाधिकरला जागृत करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा मुक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आ नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ दीपक केसरकर, आ निलेश राणे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संतोष प्रभू,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्य डॉ पंकज दिघे, जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्र्वर, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह भ प गवंडळकर महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, सौ शालन ठाकूर, गोटया सावंत, अंकुश जाधव, सुविनय दामले, मृणाल देसाई, अशोक दळवी आदी उपस्थित होते.