रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन
शेतक-यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होते , त्यासाठी आवश्यक ते तंत्र आत्मसात केले पाहिजे. भात शेती मध्ये उत्पादित झालेला तांदुळ बाजारात उकडा तांदूळ करुन विकल्यास शेतक-यांनी चांगला नफा होईल . रासायनिक खतांचा मर्यादित वापर करुन पारंपारिक सेंद्रीय खतांचा वापर शेतक-यांनी करावा. विषमुक्त शेती करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही मार्गदर्शन करु शेतक-यांनी पारंपारिक बी –बियाण्यांची जोपासना केली पाहिजे. शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी असे , आवाहन छ. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी केले.
असलदे ग्रामपंचांयत येथील रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर , माजी चेअरमन प्रकाश परब , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे , कृषी तज्ञ प्राध्यापक प्रसाद ओगले , आत्मा व्यवस्थापक विनायक पाटील , माजी सरपंच लक्ष्मण लोके , माजी व्हाईस चेअरमन प्रदिप हरमलकर , ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे , विद्या आचरेकर , विद्या डामरे , सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात , कृषी सहाय्यक श्री. बुदवळे , कृषी पर्यवेक्षक हुसेन आंबार्डेकर , ग्रामसेवक आर. डी. सावंत , संजय तांबे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , विठ्ठल खरात , अनंत तांबे , परशुराम परब , सचिव अजय गोसावी , रघुनाथ लोके , संजय डगरे , महेश लोके , मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर ,विनायक दळवी , सुरेश मेस्त्री , दिपक तांबे , विजय नरे , दया लोके , प्रकाश डामरे , अनिल लोके , ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सायली दळवी, सत्यवान घाडी आदींसह आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. ओगले म्हणाले, आंबा , काजू , केळी , नारळ कुठलीही झाडे लावली तरी त्याला रेतन देण्याची गरज आहे. म्हणजेच शेणखत द्या , पालापाचोळा द्या , औषधे मारा . झाडांना रासायनिक खते किंवा रासायनिक औषधे वाईट आहेत का ? तर नाही मात्र योग्य प्रमाणात त्याचा वापर शेतक-यांनी केला पाहिजे. काजु लागवड करत असताना त्याचे वय किती आहे यावर खतांचे डोस देणे आवश्यक आहे . काजु चे लागवड करताना २ झाडांमधील अंतर ७ मीटर असणे आवश्यक आहे. प्रत्येक एकरला सत्तर ते ऐंशी काजुची रोपे शेतक-यांनी लावावीत . शेणखत , पालापाचोळा वाळवी प्रार्दुभाव रोखण्यासाठी वापरावी. झाडांच्या आजुबाजुला सुक्ष्मजीव वाढीसाठी मदत करतात. त्यासाठी शेणखत , गोमुत्र आणि पालापाचोळा शेतक-यांनी वापरावा. पुर्वीची पारंपारिक भातबियानी सुध्दा आता मागणी होताना दिसत आहेत . खतांचा अतिरिक्त वापर हानिकारक आहे. झाडांची लागवड करताना मर्यादित अंतर ठेवणे आवश्यक आहे. झाडांना जास्त पाण्याची आश्यकता नाही , त्यांना वाफारा आवश्यक असतो. झाडांना वाईट सवयी आपण लावू नका.
आत्मा समिती व्यवस्थापक विनायक पाटील म्हणाले , कृषी विभागांअंकर्गत विविध योजना शेतक-यांसाठी राबवले जात आहेत. शासनाच्या धोरणानुसार काजु बागायतदार शेतक-यांसाठी गटशेती योजना राबवण्यात येत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने शेतक-याने पुडाकार घ्यावा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. सेंद्रीय वीस शेतक-यांचा गट प्रत्येकी 1 हेक्टर काजू बागा असलेली शेतकरी आवश्यक आहेत. त्यांना प्रशिक्षण व सहली च्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शन केले जाईल. ३ वर्षासाठी प्रत्येक शेतक-याला ३१ हजार प्रमाणे अनुदान शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. तरी योजनेमध्ये असलदे गावातील काजू बागायतदार शेतक-यांनी सहभागी व्हावे .
सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले , शेतकरी मेळावा हा शेतक-यांना तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं यासाठी आयोजित केला आहे. त्यामागील मुख्य हेतू म्हणजे माझ्या गावातील शेतक-यांच्या शेती उत्पन्नात वाढ होईल या दृष्टीने आहे. प्रथमच सोसायटी मार्फत हा मेळावा आयोजित करुन शेतक-यांना दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. भविष्यात या मेळाव्यात कृषी तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे पडीक क्षेत्रावर लागवड वाढेल,आणि शेती उत्पन्नात वाढ होईल .
या शेतकरी मेळाव्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल गावाच्या वतीने प्रा. प्रसाद ओगले व आत्माचे व्यवस्थापक विनायक पाटील यांचा सत्कार चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल, सुपारी वृक्ष देऊन करण्यात आला. कार्यंक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी केले.