रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील सावंतवाडी ते मळगाव जाणाऱ्या रस्त्यावर माजगाव दत्त मंदिर लगत भलं मोठं झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर ग्रामस्थांकडून झाड हटविण्याचे काम सुरु झाले होते.