आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील जागृत चिंदर गावच्या दुसऱ्या टप्प्यातील डाळपस्वारीला आज सोमवारी प्रारंभ झाला. सकाळी 11 नंतर श्रींची डाळपस्वारी भगवती मंदिरातून बारापाच वतनदार, मानकरी तसेच जनसागरासह ढोल-ताशासह वाजत गाजत, हरहर महादेवच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली. डाळपस्वारी आज सडेवाडी ब्राह्मण मंदिर, सिध्देश्वर मठ, येथून दुपारी पिसाळी ब्राह्मणदेव मंदिर, तेरईवाडी, संध्याकाळी तेरई ब्राम्हण येथे विश्रांती घेऊन, उद्या 19 मार्चला संध्याकाळी भगवंतगड किल्ला येथील सिध्देशश्वराचे दर्शन घेऊन रेडेचाळा, लब्देब्राम्हण, कोळकर ब्राह्मण, केळब्राम्हण यांची भेट घेऊन रात्री उशिरा गांगेश्वर मंदिरात पोहोचणार आहे. 21 मार्चला संध्याकाळी डाळपस्वारी गावडेपुरूष मंदिर, विने प्रभू, भावई ब्राह्मण, श्री दत्त मंदिर येथून सातेरी मंदिर (गावठणवाडी) येथे रात्री उशीरा पोहोचणार आहे.














