हरी वारंग यांच्या महापुरुष पेन्टस च्या शाॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उध्दघाटन
सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथील प्रसिद्ध उद्योजक निरवडे गावचे माजी सरपंच हरी वारंग यांच्या आरोस फाटा येथील महापुरुष पेंन्टस चे उद्घाटन आज सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सिताराम गावडे यांच्या हस्ते फित कापून मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
शिवप्रतिमेला सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी बोलताना सिताराम गावडे यांनी वजा शून्यातून हरी वारंग यांनी हे विश्व निर्माण केले आहे,आरोस फाट्यावरील उजाड माळरानावर वारंग यांनी आपल्या कल्पकतेतून जे व्यवसाय उभे केले आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत, स्थानिकांच्या हाताला काम देऊन त्यांच्या चुली पेटवण्याचे काम वारंग यांनी केले आहे, हे करत असताना त्यांनी सर्वांना सोबत घेतले त्यामुळे त्यांच्या मागे कोण राहिले नाहीत व त्यामुळे मागे खेचण्याचा प्रश्नच उध्दभवला नाही, त्यामुळे वारंग परिवारांचा यशाचा आलेख उंचावत गेला ,आरोस फाट्यावर जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येक क्षेत्रात लागणाऱ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळण्याची किमया हरी वारंग यांच्या मुळे साध्य झाली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे असे गावडे यांनी स्पष्ट केले, यावेळी बोलताना अनेक वक्त्यांनी वारंग परिवारांच्या धाडसाचे व यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या महापुरुष पेन्टस च्या दालनात एशियन पेंटचे सर्व प्रकार उपलब्ध असणार आहेत, ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अनेक व्यवसायामध्ये हरि वारंग व त्यांच्या दोन्ही मुलांनी यश संपादन केले आहे, तसेच यश या व्यवसायातही त्यांना मिळेल असे अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी म्हापसा गोवा येथील नगरसेवक स्वप्निल शिरोडकर पर्यटन व्यावसायिक मोरडकर निरवडे ग्रामपंचायत माजी सदस्य नागेश गावडे, झोळंबे हायस्कूलचे शिक्षक समीर परब ,महापुरुष पेंट्स चे मालक हरी वारंग,सिद्धेश वारंग ,स्वप्निल वारंग,डॉक्टर क्रांतिकर, प्राचार्य मौर्य सर ,चंदू गावडे ,आसोलकर सर, भालचंद्र गोसावी सर ,भरत धाऊसकर काका धाऊसकर, संभाजी माळकर ,संदीप माळकर ,न्हावेली माजी सरपंच मोहन नाईक ,अशोक शिवलकर, लक्ष्मण माळकर, निरवडे उपसरपंच श्अर्जुन पेडणेकर ,विश्राम नाईक,आदी मान्यवर व बुजुर्ग मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती













