आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

चंद्रशेखर तांबट, दत्तप्रसाद पेडणेकर, श्रीधर साळुंखे, नंदकुमार आयरे यांना पुरस्कार जाहीर ६ जानेवारी ला होणार पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे २०२३ चे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण…

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर दृष्टीच गेली

आमदार वैभव नाईक यांनी त्या नेत्रालया ला धडक देत विचारला जाब मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत संबंधीत नेत्रालयाच्या…

कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान

सरपंचांच्या हस्ते केले विकास कामाचे भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : आमदार वैभव नाईक यांनी कवठी गावातील गावकरवाडी येथे साकव बांधण्यासाठी ४५ लाख रु. मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षाच्या महिला सरपंच स्वाती करलकर यांच्या हस्ते श्रीफळ…

तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धाना शिडवणे येथे प्रारंभ

“महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो….” – रवींद्र उर्फ बाळा जठार खारेपाटण (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त…

अवैध गुटखा वाहतुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महंमद सादिक आदम शेख चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 15 लाख रुपये किंमतीच्या अवैध गुटखा वाहतुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी महंमद सादिक आदम शेख याचा अटकपूर्व जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्री. एच.बी.गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने…

वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्षपदी तेजस आंबेकर तर सचिवपदी सुरेंद्र नारकर यांची निवड

वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या तालुका कार्यकारीणीची वार्षिक सभा संघटनेचे माजी अध्यक्ष रत्नाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज संजय सावंत यांच्या निवासस्थानी पार पडली.या सभेत तीन वर्षाकरीता नवीन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.वैभववाडी…

यादव साहेब ऑनलाईन जुगारावरील कारवाईचे “त्यांच्या” कुटुंबियांकडून होतेय अभिनंदन

विशेष संपादकीय राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या एजंटांवर नुकतीच 26 डिसेंबर रोजी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि कणकवली पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही कारवाई जरी लहान असली तरी ऑनलाईन जुगार चालविणाऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारी…

भडगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळीचा उपक्रम कुडाळ (अमोल गोसावी) : ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या संस्थेच्या वतीने कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बुद्रुक मधील पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार सहाशे रुपये ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये विद्यालयाच्या…

शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम झाला तरच जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल – मनिष दळवी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर त्याला शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकरी आर्थिकदृष्या सक्षम होत नाही तोपर्यंत आपला जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही. असे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान. श्री.…

“को.म.सा.प. मालवणची ‘बीज अंकुरे अंकुरे’ आणि ‘ये गं ये गं सरी’ दोन्हीही पुस्तके अक्षरमेवा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाचन मंदिरांना ती अक्षरभेट देणार!”- किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने अलीकडे प्रकाशित केलेली ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित) आणि ‘ये ग ये ग सरी’ (कविता संग्रह) ही दोन्ही पुस्तके…

error: Content is protected !!