आमदार नितेश राणेंनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या नूतन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. पोलीस महासंचालक शुक्ला यांच्याशी अनौपचारिक बोलताना महायुती चे सरकार राज्यात असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य पोलीस प्रशासनाला असणार आहे. त्यासोबतच राज्यात धार्मिक, जातीय सलोखा राखण्यासाठी भाजपा आमदार आणि कार्यकर्ता म्हणून सदैव तत्पर असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!