आमदार नितेश राणेंच्या हस्ते वागदे ग्रामसचिवालयाचे 5 मार्च रोजी भूमीपूजन

ग्रामपंचायत सह मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय, विजवीतरण, पोस्ट ऑफिस असणार एकाच छताखाली

उपस्थित राहण्याचे वागदे सरपंच संदीप सावंत यांचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे नविन ग्रामपचायत इमारत बांधणे नमो ११ नमो ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत मंजूर झाले. महाराष्ट्र राज्यातील ७३ ग्रामपंचायतींनाच सदर अभियानात घेण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हयातून २ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला. त्यामध्ये कणकवलीतून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असून आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले. या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, विद्युत वितरण कार्यालय, पोस्ट ऑफीस, बचत गट ग्रामसंघ कार्यालय इत्यादी कार्यालये एकत्रितरित्या होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सरपंच सदीप रमाकांत सावंत यांनी जि. प. च्या माध्यमातून ८ गुंठे जागेची परवानगी घेऊन सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे.

आमदार नितेशजी राणे यांचे शुभहस्ते व मा, गटविकास अधिकारी उच्च स्तर (वर्ग १) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक ०५/०३/२०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे.

error: Content is protected !!