आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

एकनाथ शिंदेना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं

निवडणूक आयाेगाचा उद्धव ठाकरेंना माेठा धक्का दिल्ली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले.निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.…

वक्तृत्व स्पर्धेत अन्नपूर्णा चव्हाण, प्रेरणा,खेडेकर प्रथम

शनिवारी कुडाळात होणार अंतिम फेरी : केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, पडवेतर्फे शिवजयंतीनिमित्त येथील एचपीसीएल हॉल येथे आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सातवी ते दहावीच्या गटात अन्नपूर्णा संदीप चव्हाण हिने तर…

वागदेतील हायवे रस्त्याचे काम तसेच आंबोलीतील पब्लिक टॉयलेट ची कामे तातडीने पूर्ण करा

खा.विनायक राऊत यांचे दिशा बैठकीत निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नॅशनल हायवेवरील अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज नियोजन भवन…

ओरोस येथील ‘तोंड बंद’ आंदोलनाला लोकशाही प्रेमींचा उत्तम प्रतिसाद

भाषणबाजीला फाटा : तोंडावर काळी पट्टी : आंदोलकांनी केले वाचन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्यावतीने…

शिवजयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात जिल्हा स्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजपा महिला मोर्चा, प्रदेश सदस्या तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण,…

शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथे भव्य दिव्य अशा शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता भव्य शिवज्योत आगमन, सकाळी…

इलाका तेरा… धमाका मेरा

कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला याची युवा सेनेकडूनच कबुली सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे आज सायंकाळी कणकवलीत आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून इलाका तेरा… धमाका मेरा टॅगलाईन चे बॅनर झळकलेत. या बॅनर च्या अर्थाची…

भू ता.राजापूर जि.प शाळेच्या व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळेला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भू ता.राजापूर, जि.रत्नागिरी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेल्या जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला सदिच्छा भेट दिली. व शाळेची पाहणी केली.…

सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळच्या स्नेह मेळाव्यात आम. नितेश राणेंनी घेतला गावाकडच्या समस्यांचा आढावा

पुणे ते सावंतवाडी कोकण रेल्वे चालू करण्याची आमदार राणेंकडे मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळचा स्नेह मेळावा नुकताच थाटामाटात संपन्न झाला आहे. कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यानंतर नितेश राणे यांनी पिंपरी-चिंचवड…

शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीदिनी विविध उपक्रम

शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे प्रताप भोसले यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार, १९ फेब्रुवारीला प्रतिवर्षाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चारचाकी रॅली तसेच आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात…

error: Content is protected !!