इलाका तेरा… धमाका मेरा

कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला याची युवा सेनेकडूनच कबुली

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे आज सायंकाळी कणकवलीत आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून इलाका तेरा… धमाका मेरा टॅगलाईन चे बॅनर झळकलेत. या बॅनर च्या अर्थाची दुसरी बाजू लक्षात घेतली तर एका अर्थाने कणकवली तालुकाच नव्हे तर विधानसभा मतदारसंघ हा निःसंशय राणेंचाच बालेकिल्ला असल्याचे बिनशर्त युवासेनेने कबूल केल्याचे दिसून येते. महविकास आघाडीच्या शिल्पकारांमधील एक असलेले शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत आज सिंधुदुर्ग दौऱ्यात येऊन काय बोलणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. अपेक्षेप्रमाणे राणेंच्या होमपीचवर येऊन राणेंवर आणि भाजपावर शब्दबाण सोडण्याचे तोंडसुख खा. संजय राऊत घेणार हे सर्वांनीच गृहीत धरलेले आहे. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हटले जाणारे खा संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसेनेत, युवा सेनेत प्रचंड उत्साह आहे.मात्र या अतीउत्साहाच्या भरात युवासेनेने कणकवली म्हणजे राणे हे समीकरण नकळतपणे कबूल करून टाकले हे युवा सेना पदाधिकाऱ्यांच्याही लक्षात आले नसेल.

error: Content is protected !!