सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळच्या स्नेह मेळाव्यात आम. नितेश राणेंनी घेतला गावाकडच्या समस्यांचा आढावा

पुणे ते सावंतवाडी कोकण रेल्वे चालू करण्याची आमदार राणेंकडे मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड, पुणे येथे सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळचा स्नेह मेळावा नुकताच थाटामाटात संपन्न झाला आहे. कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यानंतर नितेश राणे यांनी पिंपरी-चिंचवड येथे स्थायिक असलेल्या सिंधुदुर्गवासीय कार्यकर्ते यांच्या घरी जाऊन आवर्जून भेट दिली. तसेच त्या ठिकाणी भेटीगाठी दरम्यान गावाकडच्या समस्या जाणून घेतल्या. पुणे ते सावंतवाडी कोकण रेल्वे चालू व्हावी, अशी सिंधुदुर्गवासीयतर्फे आमदार नितेश राणे यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!