भू ता.राजापूर जि.प शाळेच्या व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळेला सदिच्छा भेट


खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भू ता.राजापूर, जि.रत्नागिरी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेल्या जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला सदिच्छा भेट दिली. व शाळेची पाहणी केली.

यावेळी भू ता. राजापूर जि.रत्नागिरी या शाळेच्या शाळा व्यवस्थपन समितीच्या अध्यक्षा सौ गौरी सप्रे,उपाध्यक्ष मंदार सप्रे, शाळेचे शिक्षक विलास पाध्ये, रवींद्र नाडगौडा आदी मान्यवर उपस्थित होते तर खारेपाटण जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते भू जि.प.शाळेच्या शाळा समितीच्या अध्यक्षा गौरी सप्रे यांचा पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव, सदस्य संध्या पोरे, शाळा समिती सदस्य ऋषिकेश जाधव खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर उपस्थित होते.

खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शाळेविषयी तसेच शाळेच्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. तर भू जि.प.शाळेच्या समितीने संपूर्ण शाळेची पाहणी करून शाळेविषयी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!