शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथे भव्य दिव्य अशा शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता भव्य शिवज्योत आगमन, सकाळी साडे 8.30 वाजता सत्यनारायण पूजा व अभिषेक, सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पालखी सोहळा तर सकाळी 10.30 वाजता ढोल पथक तसेच लेझीम सादरीकरण होणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध मर्दानी खेळांचा डाव हे यावेळी प्रमुख आकर्षण असणार आहे. दुपारी 1.00 वाजता मान्यवरांचे मनोगत व कार्यक्रमाचा निरोप समारंभ संपन्न होणार असून त्यानंतर दुपारी 1.30 वाजता शिव भोजन महाप्रसाद होणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!