आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

हुकमी एक्का ठरणारे सुनील नारकर उतरणार जि. प. निवडणूक रिंगणात

भाजपाकडून की उबाठाकडून अद्याप प्रश्नचिन्ह वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा गावचे सुपुत्र आणि डोंबिवली येथील उद्योजक सुनील नारकर हे जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून सुनील नारकर हे जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत. मात्र भाजपाकडून…

गडमठ गावात जिओ मोबाईल टॉवर’ उभारण्याची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : गडमठ गावात मोबाईल नेटवर्कचा पूर्ण अभाव असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी व शासकीय कार्यालयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते नागेश आडके यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

देशातील पहिला AI प्रणाली राबविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नीती आयोगाचा दौरा सुरू

पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाच्या सदस्यांचे केले स्वागत सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे. या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून, आयोगाचे शिष्टमंडळ…

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे उद्या ओरोस येथे ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ कार्यक्रम

बालकवींच्या काव्यसंपदेवर ओरोस येथे साहित्यप्रेमींचा आठवा मासिक उपक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ऑक्टोबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज…

वैभववाडी आरोग्य यंत्रणेवर संदीप सरवणकर यांचा संताप : “आता ना देवावर विश्वास, ना नाथावर!”

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावच्या भुतेवाडीतील तरुणी सुंदरा शिगवण हिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गावकऱ्यांनी तातडीने उपचारासाठी उंबर्डे व नंतर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथे ना अँब्युलन्स उपलब्ध होती, ना डॉक्टर, आणि औषधोपचार तर दूरचीच गोष्ट होती.…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे केले सांत्वन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर यांचे वडील कै. दिनकर कल्याणकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कल्याणकर कुटुंबीयांचे बांदा येथील निवासस्थानी भेट देत सांत्वन केले. यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी,…

कुडाळ नगरपंचायतीच्या विकासाचा नवा टप्पा!

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज कुडाळ येथे नवीन नगरपंचायतींना मिळणाऱ्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरण या महत्वाकांक्षी कामाचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार…

बांद्यात व्यावसायिक तरुणाची आत्महत्या

मृताच्या व्हिडिओने खळबळ सावंतवाडी (प्रतिनिधी) : दुकान लावण्यास वारंवार अटकाव केल्याचे नैराश्य आल्यामुळे बांदा येथील तरुणांनी आपल्या घरातच पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. आफताब कामरूद्दीन शेख (वय ३८, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने खास व्हिडिओ करून…

पालकमंत्री नाम. नितेश राणे ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – गुरुवारी सकाळी ०७.०० वा. मोटारीने विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ०७.३० वा. जनरल…

युवतीच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार – नातेवाईकांचा आरोप

मृतदेह ताब्यात न घेण्यावर ठाम वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे भूतेश्वरवाडी येथील तरुणीचा बुधवारी सायंकाळी आकस्मित मृत्यू झाला आहे. सुंदरा प्रकाश शिवगण (वय 25) असे या तरुणीचे नाव आहे. रुग्णवाहीका व उपचार वेळेत मिळाले नसल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून…

error: Content is protected !!