वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे चेअरमन श्री. दत्तात्रय पानसरे ,महासंघाचे अन्य जेष्ठ संचालक, तसेच महासंघाचे वरीष्ठ अधिकारी उद्या सोमवार दि.29 डिसेंबर रोजी दिवसभराच्या दौऱ्यासाठी येत आहेत. दुपारी 12 वाजता जिल्हा पणन कार्यालय ओरस येथे उपस्थित राहणार आहेत .
या दौऱ्यात पणन महासंघाच्या सर्व ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग सभासद संस्था, खरेदी विक्री संघ, जिल्हा संघ,यांच्या समस्या जाणून घेणार असुन,नव्याने करावयाच्या उद्योग व्यवसाया बरोबरच शासकीय आधारभूत किंमत योजनेच्या भात खरेदी, नाचणी खरेदी चा आढावा घेणार असुन ,
पणन महासंघाच्या मळगांव,ओसरगांव येथील गोडावून ना भेटी देणार आहेत अशी माहिती पणन महासंघाचे संचालक श्री.प्रमोद रावराणे यांनी दिली.









