चिंदर येथील भजनी बुवा संदिप परब यांना कलातपस्वी आप्पासाहेब काणेकर सद्भावना पुरस्कार प्रदान!

आचरा (प्रतिनिधी) : कला तपस्वी आप्पासाहेब काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच नगर वाचनालयच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या सोहळ्यात लोकसंगीत प्रकारात अनेक वर्षे भजन सेवा करत असलेले श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीचे सुप्रसिद्ध भजनी बुवा संदिप गणपत परब यांचा संस्थाध्यक्ष महेश काणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सद्भावना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ.पी.जे.कांबळे, डॉ.राम मेस्त्री, महेश काणेकर, एकनाथ आव्हाड, प्रकाश केसरकर, अमित कांदळकर, राजेश कदम
सुनील पवार, पिंट्या दळवी , गोविंद पवार, संजय हडपी, शशिकांत नाटेकर, सत्यवान गावडे, दिनेश गोगटे, दिगंबर जाधव, अनंत तोरसोळकर, सुरेश जावकर आदी उपस्थित होते. या पुरस्कार प्राप्ती नंतर संदिप परब यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!