आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी संगणकाची मदत होईल – विजय घरत

नांदगाव प्राथमिक शाळेला प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संगणक प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना लहान वयात संगणकाची हाताळणी केल्यास पुढील जीवनात त्यांना फायदा होईल. या शाळेच्या शिक्षकांनी आपल्याकडे संगणक संचाची मागणी केली त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रिमियर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे…

जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केली बालगृहातील बालकांसमवेत दिपावली साजरी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण साजरा करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बालगृहातील बालकांना बाहेरच्या जगाचा…

दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी तिघांना जामीन

ऍड उमेश सावंत यांचा युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी सदर गाडी अडवून ५०…

सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

चर्मकार समाज उन्नती मंडळाची मागणी : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुनावनीदरम्यान मनुवादी व सनातनी विचारसरणीचा अ‍ॅड. राकेश किशोर यांनी बूट फेकून मारून हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या…

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेनिमित्त किल्ले बनवणे स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान मंडळाच्या वतीने शालेय व खुल्या गटांसाठी किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपण तयार केलेल्या किल्ल्याचा व्हिडिओ बनवून महाविद्यालयाच्या kckconference@gmail.com या मेलवर पाठवून द्यायचा आहे. किल्ले बनवताना चा…

गोठ्याला आग ; वित्तहानी

देवगड (प्रतिनिधी) : पडेल (देवरूखकरवाडी) येथे गुरुवारी मध्यरात्री यशवंत सखाराम देवरूखकर यांच्या गोठ्याला अचानक भीषण आग लागून संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटना रात्री अंदाजे ११.३० ते…

साईबाबा सोशल क्लबची सामाजिक बांधिलकी

दिवाळीनिमित्त करणार मिठाई व भेट वस्तूंचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या समाजोपयोगी उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या वागदे येथील साईबाबा सोशल क्लब ने आपली सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीनिमित्त मिठाई व भेट वस्तूंचे वाटप करण्याचे आयोजन केले आहे. सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी…

नवकिरण चे संपादक पास्कॉल लोबो जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : मागील पाच दशकाहून अधिक काळ विधायक कार्यात अग्रेसर असणारे आणि आजही लेखणीतून विविध वर्तमान पत्राद्वारे नियतकालिकेतून समाजातील समस्या व्यथा वेदना मांडणारे ‘वर्तमानपत्र लेखक हाच खरा समाजाचा जागल्या आहे’ याची…

ठाकरे शिवसेनेने लावलेल्या दिवाळी शुभेच्छा बॅनरची शहरात एकच चर्चा…!

संकेत पारकरांच्या उमेदवारीचे… विरोधकांवर आरोप भ्रष्टाचाराचे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यात होवू घातली आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या शुभेच्छा बॅर्नरच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांनी राजकीयदृष्ट्या एकमेकांना ‘लक्ष्य’करण्यात सुरूवात केली आहे. शिवसेना उबाठा पक्षाने भ्रष्टाचाराचा नरकासुर संपवू, संदेश परिवर्तनाचा…

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थांची उल्लेखनीय कामगिरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे नुकत्याच पार पडल्या. या जिल्हास्तरीय मैदानी…

error: Content is protected !!