नवकिरण चे संपादक पास्कॉल लोबो जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : मागील पाच दशकाहून अधिक काळ विधायक कार्यात अग्रेसर असणारे आणि आजही लेखणीतून विविध वर्तमान पत्राद्वारे नियतकालिकेतून समाजातील समस्या व्यथा वेदना मांडणारे ‘वर्तमानपत्र लेखक हाच खरा समाजाचा जागल्या आहे’ याची प्रचिती वेळोवेळी देणारे, विविध सामाजिक संस्थानात वेगवेगळी पदे भूषवून समाजकार्य करणारे, नियतकालिक ‘नवकिरण’ चे संपादक, कोंकण सुपुत्र पास्कॉल लोबो ह्यांना मराठी वृत्त पत्र लेखक संघ मुंबई या नामवंत संस्थेद्वारे ‘जीवन गौरव सन्मान पुरस्कार 2025’ हा पुरस्कार वृत्त पत्र दिनी (27 सप्टेंबर) सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते बहाल करून सन्मानित केले.

error: Content is protected !!