सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा

चर्मकार समाज उन्नती मंडळाची मागणी : प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुनावनीदरम्यान मनुवादी व सनातनी विचारसरणीचा अ‍ॅड. राकेश किशोर यांनी बूट फेकून मारून हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे निषेध करीत आहे. हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी जगदिश कातकर यांच्याकडे मंडळाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीदरम्यान सनातनी व मनुवादी विचारसरणीचा अ‍ॅड. राकेश किशोर याने बुट फेकून भ्याड हल्ल्या केला. हा हल्ला भारतीय न्यायव्यवस्थेवर केलेला आहे, हा प्रकार अत्यंत निंदनीय व दुर्दैवी आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला होणे म्हणजे लोकशाही, संंविधानाचा अपमान आहे. गवई यांच्यावरील हल्ला जातीवादी विचारसरणीद्वारे संविधानावर केलेला आहे. हा हल्ला दलित समाजाचा अपमान आहे. त्यामुळे हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, संतोष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र देवरुखकर, देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!