ठाकरे शिवसेनेने लावलेल्या दिवाळी शुभेच्छा बॅनरची शहरात एकच चर्चा…!

संकेत पारकरांच्या उमेदवारीचे… विरोधकांवर आरोप भ्रष्टाचाराचे

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यात होवू घातली आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या शुभेच्छा बॅर्नरच्या माध्यमातून सत्ताधारी व विरोधकांनी राजकीयदृष्ट्या एकमेकांना ‘लक्ष्य’करण्यात सुरूवात केली आहे. शिवसेना उबाठा पक्षाने भ्रष्टाचाराचा नरकासुर संपवू, संदेश परिवर्तनाचा पोहोचवू, अशा आशयचा बॅनर लावून प्रतिस्पर्धांना डिवचले आहे. मविआकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर हे असतील, असा ‘संदेश’ बॅर्नरद्वारे देत एक प्रकारे जाहीरच केले आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद व सदस्यपदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महायुती व मविआतील पक्षांनी मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. नगरसेवकपदांच्या आरक्षणाचा फटका काही माजी नगरसेवकांना बसला तर अन्य वार्डात पडलेले आरक्षण पाहून त्याठिकाणी वार्डात दिवाळीच्या निमित्ताने मतदारांशी गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आरक्षणाचा फटका न बसलेल्या माजी नगरसेवकांच्या आपल्या वार्डात जनसंपर्क वाढवला आहे. दिवाळीनिमित्ताने भाजप व ठाकरे शिवसेनेने ठिक ठिकाणी बॅर्नर लावले आहेत. याद्वारे दोन्ही पक्षांमध्ये बॅनर वार सुरू झाला आहे. शिवसेना उबाठा पक्षाने शहरात शिवसेना उबाठा पक्षाने भ्रष्टाचाराचा नरकासुर संपवू, संदेश परिवर्तनाचा पोहोचवू, अशा आशायचा बॅनर्स लावून प्रतिस्पर्धांना डिवचले आहे. हे बॅनर लक्षवेधी अन् राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

ठाकरे शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत, अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, मधुरा पालव, कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, रुपेश नार्वेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे फोटो व पक्षाचे मशाल चिन्ह आहे. युवासेनेच्या माध्यमातून शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!