अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेनिमित्त किल्ले बनवणे स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान मंडळाच्या वतीने शालेय व खुल्या गटांसाठी किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपण तयार केलेल्या किल्ल्याचा व्हिडिओ बनवून महाविद्यालयाच्या kckconference@gmail.com या मेलवर पाठवून द्यायचा आहे. किल्ले बनवताना चा व्हिडिओ आणि त्या किल्ल्याविषयी संबंधित माहिती सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये असली पाहिजे. कणकवली महाविद्यालयात दिनांक १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होत आहे. या निमित्त ऐतिहासिक वास्तूंची जिज्ञासा वाढावी व राष्ट्राभिमान जागृत व्हावा या उद्देशाने शालेय व खुल्या गटांसाठी किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धेचे व्हिडिओ दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंत पाठवावयाचे आहेत.

सदर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतः किल्ले बनवणे आवश्यक आहे. किल्ले बनवण्यासाठी फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करावा व व्हिडिओ कमीत कमी तीन मिनिटापर्यंत स्पष्ट दिसेल असा व्हिडिओ तयार करून पाठवावे असे आवाहन प्र. प्रा. युवराज महालिंगे, डॉ. सोमनाथ कदम, इतिहास विभाग प्रमुख, उपक्रम समिती प्रमुख डॉ. रामदास बोलके, सागर गावडे, अक्षय जाधव व प्रा. साहिल माणगावकर यांनी केले आहे. सदर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी व विजेत्यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!