आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नांदोस भवानी मित्रमंडळाच्या वतीने गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी) : श्री देवी भवानी समता मित्रमंडळ नांदोस चव्हाणवाडी यांच्यावतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वसंत चव्हाण, सचिव सूर्यकांत चव्हाण, खजिनदार अमित चव्हाण, तसेच मंडळाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या…

गोपुरी आश्रमात ‘जागर स्त्री शक्तीचा उत्सव विचारांचा’ कार्यक्रमाचा सांगता समारंभ संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नव्हे, तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या असामान्य कर्तृत्वाच्या स्त्रियांचा गौरव करण्याचा, त्यांच्याप्रती आदर व सन्मान व्यक्त करण्याचा चैतन्यमय सोहळा आहे. याच उद्देशाने गोपुरी आश्रमात आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा उत्सव विचारांचा’ हा उपक्रम मोठ्या…

भावजयीस मारहाण प्रकरणातून दिर जावांची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : 11 फेब्रुवारी, 2021 रोजी कुरंगावणे गाडेवाडी येथील स्वराली कदम हीच्या सार्वजनिक घराच्या परसवातील केळीची झाडे तिचा दिर सचिन चंद्रकांत कदम याने तोडली याबाबत विचारणा केली असता सचिन कदम, त्याची पत्नी सानवी, दुसरा दिर राजेंद्र कदम तसेच त्याची…

गोविंद बागवे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद रघुनाथ बागवे वय 82 यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता मसुरे येतील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी…

आशिये ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना दाखले देण्याची सेवा

सरपंच महेश गुरव यांची माहिती ; सेवा पंधरवड्यानिमित्त आशिये ग्रामपंचायतचा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा सप्ताह उपक्रम सुरु आहे. त्यानिमित्त गावात विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेण्यात येत आहेत. गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायत…

देशाच्या एकता आणि अखंडतेला अर्बन नक्षलवादापासून सर्वांधिक धोका

जनसुरक्षा विधयेक लोकहिताचे अ‍ॅड. संदीप जाधव यांचे मत ; जानवली येथे जनसुरक्षा विधेयकावर पत्रकारांसमवेत चर्चासत्र कणकवली (प्रतिनिधी) : भारताची राज्यघटना कोणतेही सरकार बदलू शकणार नाही. सध्या केंद्र सरकार हे राज्यघटना बदलणार असा फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून समाजात पसरविला जात आहे. तत्कालीन…

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव”

देवगड (प्रतिनिधी ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथील शाखेला भेट देऊन संघ स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांसोबत त्यांनी संवाद साधला…

दीक्षित फाउंडेशनतर्फे ‘आनंदोत्सव’ कार्यक्रम उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पडेल नं. १ येथे दीक्षित फाउंडेशनतर्फे नुकताच ‘आनंदोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रासोबतच विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स, संगीत…

देवगड बीएसएनएल कार्यालय फोडले ; २८८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस

देवगड (प्रतिनिधी ) : देवगड येथील भारत संचार निगम कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश करून  भारत संचार निगम कार्यालयातील एलसीसीकार्ड,(९६) कन्ट्रोल कार्ड,(२००) पॉवर सप्लाय कार्ड,(१२) प्रत्येकी रु. २००/- किमतीची एकूण रु २८८००/मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.…

लिंगेश्वर देवस्थानाची ‘इस्ताद’ पारंपरिक मानकऱ्यांच्या ताब्यात देण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश

ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. पृथ्वीराज रावराणे यांचा युक्तिवाद सावंतवाडी (प्रतिनिधी) : कलंबिस्त येथील श्रीदेव लिंगेश्वर पंचायतन देवस्थानाची ‘इस्ताद’ (देवाची मुखवटे, वस्त्रे, दागिने सोन्याच्या नथी इत्यादी सामानाची पेटी) देवस्थानाचे मानकरी बुधाजी शिवा राऊळ यांच्या ताब्यात त्वरित देण्यात यावी, असा एक महत्त्वपूर्ण…

error: Content is protected !!