नांदोस भवानी मित्रमंडळाच्या वतीने गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी) : श्री देवी भवानी समता मित्रमंडळ नांदोस चव्हाणवाडी यांच्यावतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वसंत चव्हाण, सचिव सूर्यकांत चव्हाण, खजिनदार अमित चव्हाण, तसेच मंडळाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या आपल्या मनोगताद्वारे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा, ए. आय. टेक्नॉलॉजी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, स्वच्छता ही सेवा अभियान तसेच विकास कामांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच श्री भवानी मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात येणारे सांस्कृतिक सामाजिक व धार्मिक उत्सव हे नेहमीच प्रशंसनीय असतात, भविष्यात असेच उपक्रम मंडळाने राबवावेत अशा शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!