मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथील रहिवासी तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद रघुनाथ बागवे वय 82 यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता मसुरे येतील स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांचा मनमिळावू स्वभाव होता. गावातील धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. जुन्या काळात मालवण तालुक्यात प्रसिद्ध लाकूड तोडकामी म्हणून ते प्रसिद्ध होते. मसुरे येथील थोरले घर या गावातील मानाच्या घरातील एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.तसेच आधुनिक शेतकरी म्हणून सुद्धा त्यांची गावात एक वेगळी ओळख होती. अनेकांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले होते.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी पत्रकार संतोष बागवे युवा सामाजिक कार्यकर्ते संदेश बागवे यांचे ते वडील, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक प्रसाद बागवे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बागवे यांचे ते काका होतं












