कणकवली (प्रतिनिधी) : 11 फेब्रुवारी, 2021 रोजी कुरंगावणे गाडेवाडी येथील स्वराली कदम हीच्या सार्वजनिक घराच्या परसवातील केळीची झाडे तिचा दिर सचिन चंद्रकांत कदम याने तोडली याबाबत विचारणा केली असता सचिन कदम, त्याची पत्नी सानवी, दुसरा दिर राजेंद्र कदम तसेच त्याची पत्नी ज्योती या चौघानी स्वराली हीस पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले, सचिन याने लाथेने आणि कपडे धुण्याच्या लाकडी धुपाटण्याने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली, अशी फिर्याद स्वराली हिने कणकवली पोलिस स्टेशन येथे दिली असता भां.द.वि. कलम 324, 323, 504, 506 आणि 34 प्रमाणे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन कणकवली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. सुनावणी कामी फिर्यादी, पंच, डॉक्टर, तपासिक अमंलदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षीदार यांच्या जबाबातील विसंगती, आणि सबळ पुराव्याअभावी आरोपींची कणकवली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. विलास परब आणि ॲड. तुषार परब यांनी काम पाहिले.
भावजयीस मारहाण प्रकरणातून दिर जावांची निर्दोष मुक्तता












