देवगड बीएसएनएल कार्यालय फोडले ; २८८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस

देवगड (प्रतिनिधी ) : देवगड येथील भारत संचार निगम कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश करून  भारत संचार निगम कार्यालयातील एलसीसीकार्ड,(९६) कन्ट्रोल कार्ड,(२००) पॉवर सप्लाय कार्ड,(१२) प्रत्येकी रु. २००/- किमतीची एकूण रु २८८००/मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.

 या घटनेसंदर्भात देवगड उपविभागीय अधिकारी सुधाकर शिवमुर्ती हिरामणी (५६)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदरची घटना २५ सप्टेंबर साय ६ते २६ सप्टेंबर स ७ च्या दरम्याने घडली. कार्यालयाचे वाचमन श्री सावंत हे नेहमीप्रमाणे कार्यालय उघण्यासाठी आले असता मागील दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   चोरीस गेलेल्या मुद्देमाल यात एलसीसी कार्ड ९६ रु २००/- 

कीमतीचीएकूण र क्कम १९२००/-, कंट्रोल कार्ड ३६  २०० रु किमतीची रक्कम ७२००/-, पॉवर सप्लाय कार्ड १२ रु २००/-किमतीची असा एकूण २८८००/-/-रु मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. अज्ञात चोरट्या विरुद्ध बिएनएस ३०५,३३१(३)(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक  संतोष भालेराव करीत आहेत.

error: Content is protected !!