देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पडेल नं. १ येथे दीक्षित फाउंडेशनतर्फे नुकताच ‘आनंदोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रासोबतच विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स, संगीत खुर्ची आदी विविध खेळ घेण्यात आले. विजेत्यांना आकर्षक शालेय उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला देखील भेटवस्तू व खाऊ वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत कार्यक्रमाला वेगळेच रंग भरले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे स्मित हास्य आणि आनंद हा कार्यक्रमाचा खरा यश ठरला. ऋत्विक धुरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदी अंदाजात करून विद्यार्थ्यांचे उत्तम मनोरंजन केले.
कार्यक्रमाला दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष . निरंजन दीक्षित, पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक तानवडे, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष महेश After, सुरेश देवळेकर, सदानंद कुरकळ, मुख्याध्यापिका प्रिया अपोडिकर तसेच शिक्षकवर्ग, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी उत्साहात खेळ, मौजमजा व मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घेत ‘आनंदोत्सव’ कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.












