आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिवसेना व रिपब्लिकन सेना युतीमुळे आंबेडकरी कार्यकर्ते आशादायी-आनंदराज आंबेडकर

महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी : युतीमुळे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते होतील लोकप्रतिनिधी कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांची युती झाल्यानंतर आता आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आशादायी बनले आहेत. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर नेहमीच लढत असतात; पण ते सत्तेमध्ये कधीच दिसत…

सत्तेची गुरुकिल्ली शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून मिळेल – आनंदराज आंबेडकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : “सत्ता ही सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली आहे. मात्र या सत्तेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता कुठे दिसत नाही. सध्याच्या राजकारणात सत्तेपर्यत पोहचण्यासाठी युतीला पर्याय नाही. त्यामुळे सन्मान आणि सत्तेचा राजमार्ग दाखविणारी युती आम्ही शिवसेना (एकनाथ शिंदे) सोबत केली आहे. अन्य…

पन्हाळगडावर शाही दसरा महोत्सवात चित्रकला व शिल्पकला स्पर्धेचा उत्साह

कलेतून गडाचा वारसा झाला सजीव कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकताच पन्हाळगडचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन आणि पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाही दसरा महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत दोन दिवसीय (२७ व…

करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई शारदीय नवरात्र महोत्सव सातव्या दिवशी षष्ठी तिथीला षोडषी महात्रिपुरसुंदरी रूपात सजली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबाई शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके १९४७ च्या सातव्या दिवशी षष्ठी तिथीला षोडषी महात्रिपुरसुंदरी रूपात सजली आहे. पूर्वी मदनाच्या राखेतून शिवगणांनी एक भस्माची मूर्ती तयार केली. तिला सजीव करून शिव मंत्राचा उपदेश केला.…

प्रशासकीय निष्क्रियतेच्या विरोधात फोंडाघाटचे समीर सामंत यांचे तारीख १ ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायतीने शासकीय धर्मशाळेच्या जागेवर केलेले अतिक्रमण केवळ बेकायदेशीर नसून विद्यमान कायद्यांचे उल्लंगन उघडपणे करणारे आहे. यापूर्वी अनेकदा विनंती अर्ज करून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांत – तहसीलदार – पीडब्ल्यूडी – तलाठी – ग्रामसेवक – सरपंच यांची कार्यालये…

कुडाळ मध्ये पकडला लाखोंचा गुटखा; एलसीबी ची कारवाई

करोल बंधूंसह चौघांवर गुन्हा दाखल कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ बाजारपेठ मधील राधिका कोल्ड्रिंक्स हाऊसच्या बाजूच्या पान टपरीमधून २ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा अवैध गुटखा एलसीबी च्या पथकाने पकडला. ही कारवाई शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी…

कणकवली महाविद्यालयात विभागीय आंतर महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज कणकवली येथे जिमखाना विभागातर्फे मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन – ४ ची बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तारीख २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या दरम्यान पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटन…

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील २४ तासांसाठी हवामान विषयक इशारा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार येत्या २४ तासात किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीलगत ४९ ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे…

वैभववाडी तालुक्यात एकाच रात्री आठ बंद घरे फोडली ; १.२५ लाखाची रोख रक्कम लंपास

वैभववाडी (प्रतिनिधी) : नेर्ले राववाडी व पाटिलवाडी येथील भर वस्ततीत असलेली आठ बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. यापैकी एका घरातील १ लाख २५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. तर अन्य घरातील सामान विस्कटून टाकले मात्र त्यांच्या हाती पैसे…

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रंकाळ्यावर होड्यांच्या शर्यतीने रंगला उत्साह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ च्या निमित्ताने रंकाळा तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने क्रीडाप्रेमींसह हजारो पर्यटक…

error: Content is protected !!