फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायतीने शासकीय धर्मशाळेच्या जागेवर केलेले अतिक्रमण केवळ बेकायदेशीर नसून विद्यमान कायद्यांचे उल्लंगन उघडपणे करणारे आहे. यापूर्वी अनेकदा विनंती अर्ज करून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांत – तहसीलदार – पीडब्ल्यूडी – तलाठी – ग्रामसेवक – सरपंच यांची कार्यालये यांना व परत मागे अशी पत्रांची टोलवाटोलवी सुरू आहे. मात्र या प्रशासकीय निष्क्रियतेमुळे यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे माझ्या तक्रारीवर ठोस कारवाई न झाल्यास तारीख ०१-१०-२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय सामंत यांनी घेतल्याचे तारीख १२-०९-२५ च्या पत्राद्वारे कळविले आहे व त्याच्या प्रती माहितीसाठी सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक – ओरोस, पोलीस निरीक्षक ओरोस, गटविकास अधिकारी कणकवली, तहसीलदार कणकवली यांना दिल्या आहेत.














