आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक

आज सायंकाळी ४ वा. निवासस्थानाहून निघणार अंत्ययात्रा कणकवली (प्रतिनिधी) : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय ८०) यांचे आज रविवारी १०:१४ वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.…

पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल

मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभेत मंत्री नितेश राणे यांनी मांडले विचार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्या…

वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्षपदी मंगेश कदम यांची निवड 

वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा )समितीच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे.       महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुका कृषी विभागाकडून नुकतीच आत्मा समितीची निवड करण्यात आली. मंगेश कदम खांबळे गावचे सुपुत्र…

उपळे डांगेवाडीत साई भंडारा उत्साहात पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन 

वैभववाडी (प्रतिनिधी) : उपळे येथील सिद्ध साई सेवा मंडळ डांगेवाडी यांच्यावतीने आयोजित श्री साई पालखी सोहळा, श्री साई भंडारा व सत्यनारायण महापूजेला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह…

पेट्रोलने पेटवून जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यात जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या घटस्फोटित पत्नीला पेट्रोल ओतून जाळून ठार मारल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुशांत सहदेव गोवेकर ( रा.धुरिवाडा मालवण ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी…

नवीन कुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम हुंबे यांनी केला भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेवर प्रभावित होऊन केला पक्ष प्रवेश फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली येथील सखाराम हुंबे व त्यांचे सहकारी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्ववावर प्रेरित होऊन, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली गावात झालेली विकासकामे…

अपघातात मुलीला गमावलेल्या अनिल माळवे कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे मंगळवारी झालेल्या अपघातात अणाव दाबाचीवाडी येथील अनुष्का अनिल माळवे (वय १८) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असून माळवे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज माजी आमदार वैभव नाईक यांनी अनिल माळवे यांच्या घरी…

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडे रवाना !

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मानवजातीच्या परमकल्याणासाठी आणि रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव व सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोव्याच्या फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ दिनांक १७ ते १९…

आखवणे पुनर्वसन गावठाण येथे १८ मे रोजी साई भंडारा…

वैभववाडी (प्रतिनिधी) : साई सेवा मंडळ आखवणे नागपवाडी पुनर्वसन गावठाण यांच्यावतीने रविवारी दिनांक १८ मे रोजी साईबाबा महाभंडारा कार्यक्रम साईबाबा मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे, ५. १५ वा. काकड आरती,…

गौतम बुद्धांचे विचार हे केवळ धार्मिक नसून मानवतेचे सार्वत्रिक तत्त्वज्ञान आहे…. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल

वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवान गौतम बुध्दांनी जगाला समता, करुणा आणि अहिंसेचा अद्वितीय संदेश दिला. आजही त्यांचे विचार जागतिक शांततेसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. बुध्दांनी चार आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्गाद्वारे मानवी जीवनातील दुःख, त्याचे कारण आणि त्यातून मुक्त होण्याचा मार्ग स्पष्ट केला.…

error: Content is protected !!