नवीन कुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सखाराम हुंबे यांनी केला भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेवर प्रभावित होऊन केला पक्ष प्रवेश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली येथील सखाराम हुंबे व त्यांचे सहकारी यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्ववावर प्रेरित होऊन, विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली गावात झालेली विकासकामे आणि स्थानिक नेतृत्व राजेंद्र कोलते, अमित दळवी यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे यांनी सखाराम हुंबे व त्यांचे सहकारी सुनील गोसावी, जयवंत कामतेकर, रुपेश हुंबे, केशव दळवी, सुभाष परब यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले.

या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार अजित गोगटे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, संदेश उर्फ गोट्या सावंत, राजेंद्र कोलते, अमित दळवी, बूथ अध्यक्ष अतुल डऊर, अरुण पिळणकर, कृष्णा परब आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!