वैभववाडी (प्रतिनिधी) : साई सेवा मंडळ आखवणे नागपवाडी पुनर्वसन गावठाण यांच्यावतीने रविवारी दिनांक १८ मे रोजी साईबाबा महाभंडारा कार्यक्रम साईबाबा मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे, ५. १५ वा. काकड आरती, सकाळी, ६ ते ७ वा. साई मूर्ती स्नान, सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, दुपारी १ वा. महाप्रसाद सायंकाळी ४ वा. अनुराधा आकाराम नागप यांच्याहस्ते महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी, ७ वा धूप आरती, रात्री ८ वा. साई भजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आकाराम नागप यांनी केले आहे.













