उपळे डांगेवाडीत साई भंडारा उत्साहात पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले साईबाबांचे दर्शन 

वैभववाडी (प्रतिनिधी) : उपळे येथील सिद्ध साई सेवा मंडळ डांगेवाडी यांच्यावतीने आयोजित श्री साई पालखी सोहळा, श्री साई भंडारा व सत्यनारायण महापूजेला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, महिला अध्यक्ष प्राची तावडे, सरपंच दक्षता पालांडे, माजी सरपंच देवानंद पालांडे, राजेंद्र राणे, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, प्रताप पालांडे, किशोर कांबळे, संदीप मोरे, अशोक गावडे, सूर्यकांत गावडे, अशोक नागले, प्रकाश गावडे, सौ. गोसावी, स्वप्निल सकपाळ व मंडळाचे कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त मंदिरात तीन दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम पार पडले. हरिपाठ, भव्य क्रिकेट स्पर्धा, देवतांचे पूजन, पालखी मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद, काकड आरती, देवतांचे पूजन, साई होम, सत्यनारायण महापूजा, साई भंडारा, महाप्रसाद, पैठणी स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ, विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण कार्यक्रम, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, नाटक आदी विविध कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक संदीप मोरे यांनी मानले.

error: Content is protected !!