वैभववाडी तालुका आत्मा समिती अध्यक्षपदी मंगेश कदम यांची निवड 

वैभववाडी (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा )समितीच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी प्रगतशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची निवड करण्यात आली आहे.      

महाराष्ट्र शासनाच्यावतीने तालुका कृषी विभागाकडून नुकतीच आत्मा समितीची निवड करण्यात आली. मंगेश कदम खांबळे गावचे सुपुत्र असून महाराष्ट्र शासनाचा कै. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. शेतीमध्ये नवनव प्रयोग करीत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजी पाला, कलिंगड, भुईमूग, हळद, चार सूत्री भात लागवड, ग्रीन हाऊस मध्ये भाजी पाला लागवड करीत तरुणांना शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या समितीत फुंडलिक साळुंखे,सुरज तावडे, उत्तम सुतार, महेश संसारे, सुहास सावंत, सुरज तावडे, अनुजा अंगावलकर, अभिजित पवार, मनोहर फोडके, महेश गोखले, अक्षता डाफळे, राजेंद्र मोरे, प्रदीप तावडे, दर्पना बोबकर, साक्षी भुतारणे, समाधान गुरव, संतोष हरयाण, रत्नाकर बंदरकर आदी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.या सभेला तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, आत्मा बिटियम राकेश हुले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!