Category बातम्या

वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी मंगेश कदम यांची फेरनिवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी खांबाळे येथील प्रगतीशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची फेरनिवड करण्यात आली आहे. श्री.कदम यांनी मागील कार्यकाळात आत्मा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, पीक प्रात्यक्षिके तसेच आधुनिक शेतीविषयक उपक्रमांमध्ये सहभाग…

नापणे येथे भातशेतीची नांगरणी करून एक लाखांचे नुकसान; पाच जणांविरुद्ध गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : नापणे येथील शेतजमिनीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात शेतीची नांगरणी करत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी नापणे येथील पाच जणांविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण देसाई (रा. नापणे) यांनी वैभववाडी…

हेत-शेरेवाडीत वृद्धाच्या घरातून साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत-शेरेवाडी येथील गोविंद शंकर फोंडके (वय ८१) यांच्या घरातील कपाटातून सुमारे ५ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीचे तीन सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी मे २०२५ ते १५ जुलै २०२६…

खारेपाटण येथे चिमुकल्यांच्या वतीने काढण्यात आली आषाढी एकादशी निमित्त दिंडी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुविहार व प्राथमिक विभागाच्या शालेय विद्यार्थ्यांनी खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बाजारपेठ अशी पायी विठुरायाचा गजर करत दिंडी काढली. खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यानी…

दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री – मंत्री नितेश राणे

कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटी ची कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीचा दिला लाभ ४८ हजार कोटी ची शेतकऱ्यांची विज बिल थकबाकी केली…

लोकसहभागातून असनिये शाळेला नवे किचन शेड; ग्रामस्थांनी घालून दिला प्रशासनासमोर आदर्श

बांदा (प्रतिनिधी) : शासनाच्या मर्यादित आर्थिक मदतीची वाट न पाहता असनिये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागाच्या बळावर सुमारे दोन लाख रुपये खर्चून नवीन किचन शेड उभारून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. वस्तुरूप देणगी, श्रमदान…

‘दिविजा’ वृद्धाश्रमात रंगली आषाढीची पंढरी; वारकरी दिंडीत आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग

“प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही, पण आम्ही येथेच पंढरीचा अनुभव देतो” – मैथिली फाटक कणकवली (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरण लाभले. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, अभंग, नृत्य,…

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर बनले इन्सुलीतील जनाबाई पाटील कुटुंबासाठी देवदूत

बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत इन्सुली गावातील पागावाडी येथील श्रीमती जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. श्रीमती जनाबाई पाटील यांच्या घरावरील छप्पर अत्यंत मोडकळीस आल्याने त्यांच्या कुटुंबास मोठ्या…

आचिर्णे धनगरवाडीत पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून नवी मोटर व पाइप उपलब्ध

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे धनगरवाडी येथील नळयोजनेच्या विहिरीतील मोटार बंद पडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही समस्या जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे आणि वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री…

व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. ही दिंडी शाळेपासून मडूरा तिठा मार्गे मारुती मंदिरापर्यंत नेण्यात आली. मारुती…

error: Content is protected !!