वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी मंगेश कदम यांची फेरनिवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका आत्मा समितीच्या अध्यक्षपदी खांबाळे येथील प्रगतीशील शेतकरी मंगेश परशुराम कदम यांची फेरनिवड करण्यात आली आहे. श्री.कदम यांनी मागील कार्यकाळात आत्मा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, पीक प्रात्यक्षिके तसेच आधुनिक शेतीविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

श्री. कदम यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाला असून, जिल्हा व तालुकास्तरावरील विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विविध शेती प्रयोग केले आहेत. तसेच कोकण फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून हळद, भात व नाचणी लागवडीत यांत्रिकीकरणाचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे.कदम हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषिविद्या अभ्यास मंडळावर “प्रगतीशील शेतकरी” म्हणून कार्यरत आहेत.या फेरनिवडीबद्दल मंगेश कदम यांचे वैभववाडी तालुक्यात विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.याप्रसंगी वैभववाडी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे आणि तालुका कृषी अधिकारी नितीन देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, रिद्धी सुतार, श्रावणी रावराणे तसेच आत्मा समितीचे सदस्य महेश संसारे,सुशील रावराणे, उत्तम सुतार, पवार सुप्रिया मोहिते, गौरी गावडे, बीटीएम राकेश हूले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!