Category बातम्या

गरजू व गरीब व्यक्तीना नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली आर्थिक मदत

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त सामाजिक उपक्रम वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त वेंगुर्ले शहरातील खऱ्या गरजवंत व गरजू अशा ४ व्यक्तींसाठी प्रत्येकी ५ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याचा उपक्रम भाजपाच्या माध्यमातून वेंगुर्ला नगराध्यक्ष…

गणेश तरुण मंडळ फोंडाघाट तर्फे विविध उपक्रमांनी गणेशोत्सव संपन्न !

भाविक लाडक्या बाप्पा पुढे नतमस्तक ! पो. निरीक्षक कमलेश बच्छाव आणि टीमच्या निगराणीखाली ” फोंडाघाट राजा ” चे शांततेत विसर्जन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एसटी स्टँड समोरल नाक्यावर गणेश तरुण मंडळांने बसविलेल्या फोंडाघाट महागणपतीचे विसर्जन सातव्या दिवशी डीजेला फाटा…

खा.नारायण राणेंनी घेतले उद्योजक संतोष कदमांच्या घरी गणेशदर्शन

ओरोस (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे यांच्यासह उद्योजक संतोष कदम यांच्या ओरोस येथील सिद्धी निवासस्थानी विराजमान श्रीगणेश दर्शन घेतले. कदम कुटुंबियांचे खासदार नारायण राणे परिवाराशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. गणेशोत्सवनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना आवर्जून…

गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत इंगळे

पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले अभिनंदन समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शशिकांत साहेबान्ना इंगळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशिकांत इंगळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…

कोकण चे भाग्यविधाते खासदार नारायण राणे यांचा आशीर्वाद घेऊन अमित कदम यांची ‘Mr. World’ तयारीला सुरुवात !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या मातीतून बॉडीबिल्डिंग क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे अमित अनिल कदम यांनी आगामी Mr. World स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी त्यांनी खासदार नारायण राणे साहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. राणे साहेबांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शनातून नव्या जिद्दीने…

एसटी वाहकाकडून वैध पासधारक विद्यार्थ्यांकडून, प्रवासाचे पैसे घेऊन तिकिटासाठी जबरदस्ती ?

पं.स.सदस्या मानसी मराठे मासिक सभेत आवाज उठवणार ! सभापतींना निवेदन! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडा – घोणसरी मार्गावरील घोणसरी येथील शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण महिन्याचा पूर्ण रक्कम भरून पास काढलेला असताना, तारीख १८ सप्टेंबर रोजी फोंडा – कुर्ली बस फेरीने प्रवास करणाऱ्या…

गौरी-गणपतीनंतर वैभववाडी पुन्हा शांत; चाकरमान्यांची परतीची लगबग

वैभववाडी (प्रतिनिधी) : गौरी-गणपतीच्या उत्सवामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजलेली वैभववाडी तालुक्यातील गावे आता पुन्हा शांत होऊ लागली आहेत. शनिवारी गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर सायंकाळपासूनच मुंबई, पुण्यासह विविध शहरांकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. रविवारी पहाटेपासूनच रेल्वे, एसटी बस, खासगी आरामबस तसेच…

पालकमंत्री नितेश राणेंकडून वैभववाडीतील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी

श्री गणरायाचे दर्शन घेत कार्यकर्त्यांशी साधला संवाद वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. नितेश राणे यांनी कोकीसरे…

खारेपाटण येथे ७ दिवसांच्या गणपतीचे भक्ती भावाने विसर्जन

ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावातील सात दिवसांच्या घारघुती गणपतींचे आज ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात रविवार २०…

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रम सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व…

error: Content is protected !!