खारेपाटण येथे ७ दिवसांच्या गणपतीचे भक्ती भावाने विसर्जन

ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावातील सात दिवसांच्या घारघुती गणपतींचे आज ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात रविवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळी भक्तिभावाने व जड अंत करणाने खारेपाटण येथील शुक नदीत विसर्जन करण्यात आले.

खारेपाटण गावातील शिवाजीपेठ,कोष्ट्येवाडी,कर्लेवाडी,राऊतवाडी,गुरववाडी,रामेश्वर नगर,संभाजीनगर,कोंडवाडी, हसोळटेंब कोंडवाडी,टाकेवाडी, कपिलेश्वरवाडी,कालभैरववाडी, बंदरवाडी तसेच खारेपाटण पोलिस स्टेशन मधील गणपती आदी भागातील सुमारे १०० पेक्षा अधिक घरगुती गणपतीचे आजपर्यंत विसर्जन करण्यात आले.

खारेपाटण एस टी बस स्थानक मार्गे खारेपाटण बाजारपेठ ते घोडेपाथर बंदर पर्यंत गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या.
लांबच लांब रांगा भक्ताच्या गणपती विसर्जनासाठी लागल्या होत्या.तर या मिरवणुकांमध्ये महिला – पुरुष,ज्येष्ठनागरिक, युवक – युवती तसेच लहान मुले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्ती भावने व आनंदाने सहभागी झाल्याचा दिसत होता.

खारेपाटण शुकनदीवरील घोडेपाथर बंदर येथे सामूहिक आरती घेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी खारेपाटण पोलिस दुरशेत्राच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

error: Content is protected !!