ओरोस (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्नी नीलम राणे यांच्यासह उद्योजक संतोष कदम यांच्या ओरोस येथील सिद्धी निवासस्थानी विराजमान श्रीगणेश दर्शन घेतले. कदम कुटुंबियांचे खासदार नारायण राणे परिवाराशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. गणेशोत्सवनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना आवर्जून खासदार राणे यांनी संतोष कदम यांच्या घरी जाऊन गणेशदर्शन घेतले. यावेळी उद्योजक संतोष कदम यांच्यासह डॉ. श्रेया कदम, सी.ए तन्वी कदम यांनी खासदार राणे दाम्पत्याचे स्वागत केले. डॉ तन्वी यांनी खणा नारळाने नीलम राणे यांची ओटी भरून आदरातिथ्य केले.
खा.नारायण राणेंनी घेतले उद्योजक संतोष कदमांच्या घरी गणेशदर्शन












