रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हात

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा सामाजिक उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायला मिळाले. समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

यावेळी बोलताना विशालजी परब म्हणाले, “दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुले राहील. तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन.” या शब्दांतून त्यांनी दिव्यांग बांधवांना आधाराची ग्वाही दिली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर सिद्धार्थ भांबूरे गोविंद साटेलकर बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसन्ना देसाई यांनी एक आठवण सांगताना नमूद केले की, विशालजी परब यांच्या सुविद्य पत्नी यांनीदेखील यावर्षी आपला वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असलेला जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.

error: Content is protected !!