पं.स.सदस्या मानसी मराठे मासिक सभेत आवाज उठवणार ! सभापतींना निवेदन!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडा – घोणसरी मार्गावरील घोणसरी येथील शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण महिन्याचा पूर्ण रक्कम भरून पास काढलेला असताना, तारीख १८ सप्टेंबर रोजी फोंडा – कुर्ली बस फेरीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून, वैध पास असूनही प्रवासाचे पैसे घेऊन तिकीट देण्यात आले. ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यावर अनावश्यक आर्थिक भार टाकणारी आहे …
वस्तुतः सदर पास एक महिन्याच्या कालावधीसाठी आगाऊ रक्कम भरून दिला जातो. गणेशचतुर्थीच्या काळात अतिरिक्त शालेय वर्गासाठी मुले नियमित ये – जा करतात. त्यामुळे वैध पासधारकांकडून पुन्हा तिकिटाचे पैसे घेणे अयोग्य आहे. चौकशी करून विद्यार्थ्यांकडून घेतलेली रक्कम परत करावी. तसेच भविष्यात सवलतीच्या वैध पासधारकांकडून तिकिटांचे पैसे कुठेही घेतले जाणार नाहीत,याची वाहक व स्थानिक वाहतूक नियंत्रक यांना सत्ता सूचना द्याव्यात. अशी मागणी भाजपा पं.स. कणकवली लोरे नंबर एक मतदार संघाच्या सदस्य सौ. मानसी मराठे या येत्या पं.स. सभेमध्ये करणार आहेत. याचे निवेदन त्यांनी सभापती पं.स. कणकवली यांना दिले आहे….












