Category बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांचा सन्मान

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रगतशील शेतकरी महेश रामदास संसारे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते श्री. संसारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला मिळणार गती;बंदरातील २२ विकासकामे जाणार पूर्णत्वास

मंत्री नितेश राणे यांनी आनंदवाडी मत्स्यबंदर विकसित करण्याबाबत घेतली मत्त्वपूर्ण बैठक मच्छीमारांच्या गरजांनुसार कामांचे नियोजन; ऑक्टोबरपासून गाळ काढण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य…

‘कचरा टाकू नये’च्या फलकाखालीच कचरा; गटारातील घाण वाहून रस्त्यावर

तरंदळे फाट्यावर दुर्गंधीचा त्रास कणकवली (प्रतिनिधी) : ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘आपला परिसर स्वच्छ ठेवा’, ‘येथे कचरा टाकू नये’ असे संदेश देणारे फलक प्रशासनाकडून गावोगावी लावले जातात. मात्र, कणकवली तालुक्यातील जानवली ग्रामपंचायत हद्दीतील तरंदळे फाटा येथे या फलकांनाच जणू केराची…

जल-मृद संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘रील स्पर्धा’; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जल व मृद संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक-युवतींनी जल व मृद संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली…

जल-मृद संवर्धनासाठी २१ ऑगस्टला ‘महा वॉकथॉन’; सिंधुदुर्गात सामूहिक चालण्याचे आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जल व मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘महा वॉकथॉन – Walk for Water 2026’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला, एक पाऊल पुढे टाकूया जल-मृद संवर्धनासाठी!’ या संदेशासह नागरिकांना या…

सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद खानोलकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर (८२) यांचे आज सोमवारी येथील खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. खानोलकर हे निष्णात बालरोगतज्ञ असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाभरातून त्यांच्याकडे…

श्रमदानातून स्वच्छतेचा आदर्श, काळसे ग्रामपंचायत आणि प्रगत शेतकरी गटाचा स्तुत्य उपक्रम

चौके (प्रतिनिधी) : प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त गाव अभियान राबवण्या साठी ग्रामपंचायत काळसेने केलेल्या आवाहनाला गावातील प्रगत शेतकरी गट तसेच इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी गावात स्वच्छता मोहीम राबवून काळसे रवळनाथ मंदिरानाजिक असलेल्या ओहोळाच्या जलप्रवाहात…

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वायंगणी ग्रामपंचायतीकडून वृक्षवाटप..!

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामस्थांना काजूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रोपांचे वाटप सरपंच रुपेश पाटकर व उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांच्या…

अल्पशा आजाराने जगन्नाथ विरनोडकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील जगन्नाथ उर्फ नाथा शिवराम विरनोडकर (वय 68) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

उत्कृष्ट फलंदाज व हनुमान सेवक मंडळाचे कार्यकर्ते मोतीराम उर्फ गुंडु येडवेंचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील मोतीराम राघोबा उर्फ गुंडु येडवे (वय 51) यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. शनिवारी सकाळी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट फलंदाज तथा श्री हनुमान सेवक मंडळ बांदा चे क्रियाशील…

error: Content is protected !!