बांदा (प्रतिनिधी) : बांदा उभाबाजार येथील मोतीराम राघोबा उर्फ गुंडु येडवे (वय 51) यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. शनिवारी सकाळी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट फलंदाज तथा श्री हनुमान सेवक मंडळ बांदा चे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात मुलगा, भाऊ, बहीणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उत्कृष्ट फलंदाज व हनुमान सेवक मंडळाचे कार्यकर्ते मोतीराम उर्फ गुंडु येडवेंचे निधन












