आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामस्थांना काजूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या रोपांचे वाटप सरपंच रुपेश पाटकर व उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच गावात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजना रेडकर, शामा नाईक, अर्चना सावंत, मालती जोशी, श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, ग्रामपंचायत अधिकारी साक्षी पिंगुळकर, रावजी सावंत, पोलीस पाटील हर्षद बेनाडे आदी उपस्थित होते.












