चौके (प्रतिनिधी) : प्लास्टिक मुक्त व कचरामुक्त गाव अभियान राबवण्या साठी ग्रामपंचायत काळसेने केलेल्या आवाहनाला गावातील प्रगत शेतकरी गट तसेच इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी गावात स्वच्छता मोहीम राबवून काळसे रवळनाथ मंदिरानाजिक असलेल्या ओहोळाच्या जलप्रवाहात अडकलेला प्लास्टिक आणि इतर कचरा श्रमदानाने साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत काळसे सरपंच विशाखा काळसेकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत राऊळ, ख़ुशी राऊळ, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर, श्याम मालवणकर, मनोज मालवणकर, सुनील मालवणकर, अजित मालवणकर, लीलाधर नाईक, ज्ञानेश्वर सातार्डेकर, शाहू वरक, मंदार मयेकर, सतीश जुवेकर, रोहित आजगावकर, सागर हळदणकर, उमेश खानविलकर, संजय गोसावी, दिनेश काळसेकर, नम्रता परब, सागर हळदणकर यांनी स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात कचरा हटविला.
काळसे ग्रामपंचायत आणि प्रगत शेतकरी गटाच्या या स्तुत्य उपक्रमाने स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक काळसे गावाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.












