Category मसुरे

मसूरेत 7 फुट लांबीच्या अजगरास जीवदान !

मसुरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर मसुरे गडघेरावाडी बाजारपेठ नजिक संतोष परब यांच्या निवासस्थाना नजिक आढळून आलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सदर अजगर अंगणात आढळून आल्यानंतर मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण…

बांदिवडे पालयेवाडीयेथे दहीहंडी उत्साहात !

मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे येथे कृष्ण जन्माष्ठमि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. पालयेवाडी येथील दहीहंडी तीन थर लावून फोडण्यात आली. यावेळी चंद्रकांत परब, उदय सावंत, प्रशांत परब, रंजन प्रभू, सुभाष परब, सिद्धेश प्रभू, किरण सावंत , सुशांत परब , हरेश…

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा आजचा  राज्यस्तरीय व्यापार बंद तात्पुरता स्थगित!

बाजार समिती, जीएसटी व अन्य विषयावर समितीची स्थापना    मसुरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे २७ ऑगस्ट रोजी पुकारलेला  एक दिवसीय महाराष्ट्र व्यापार बंद तात्पुरता स्थगित करण्यात आल्याची माहीती कृती समिती तर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज…

मुंबई शूटिंगबॉल असो. ची कार्यकारिणी जाहीर !

अध्यक्षपदी शामभाई सावंत,सरचिटणीसपदी दीपक सावंत यांची निवड मसुरे (प्रतिनिधी) : मुंबई शूटिंगबॉल असो.ची त्रैवार्षिक (२०२४-२७) कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माजी आमदार शामभाई सावंत तर सरचिटणीसपदी मसुरे गावचे सुपुत्र दीपक सावंत यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या…

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा !

प्रकल्प संचालक आत्मा नाईक नवरे यांचे प्रतिपादन त्रिंबक येथील तालुका स्तरीय रानभाजी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी) : आहारात रान भाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज उपलब्ध असतात. विविध आजाराना दूर ठेवण्यासाठी आहारात या भाज्या आपण…

बिळवस बीएसएनएल टॉवर पाच दिवस बंद !

मसुरे (प्रतिनिधी) : बिळवस श्री सातेरी जलमंदिर नजीकचा बि एस एन एल चा मोबाइल टॉवर 17 ऑगस्ट पासून बंद असल्याने मोबाइल धारकांची गैरसोय होत आहे. येथील ग्रामस्थांनी मालवण तसेच सावंतवाडी येथील कार्यालयात अधिकाऱ्यांचे वेळोवेळी लक्ष वेधून सुद्धा दाखल घेतली जात…

ओझर विद्यामंदिर येथे 22 ऑगस्ट पासून तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मसुरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक कल्याण संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच मालवण तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 22 ते 24 ऑगस्ट या कालावधीत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती…

बांदिवडे साठी एसटी फेरीची मागणी !

बांदिवडे ग्रामस्थ संघाने वेधले विभाग नियंत्रकांचे लक्ष मसुरे (प्रतिनिधी) : बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांची भेट घेत एसटीच्या फेरी बाबत निवेदन दिले. कणकवली आगारातून बांदिवडे साठी सकाळी 9.15 वा सुटणारी फेरी कोरोना कालावधीपासून बंद…

सिंधू रनर्सच्या सर्धेत ब्युटीज ऑन व्हिलस सदस्यांनी पाडली छाप! 3 तासात मायलेकी धावल्या 25 किमी

मसुरे (प्रतिनिधी) : आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अशा वेळी त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी व समाजात व्यायामाचे फिटनेसचे महत्व कळण्यासाठी जनजागृती करण्याचे काम सिंधू रनर टीम गेली चार वर्षे करत आहे. 6 तास व 12 तास सावंतवाडी रन यशस्वी…

निवृत्त पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी बळवंत राणे यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मूळ पेंडूर येथील डॉ. बलवंत प्रभाकर राणे वय 62 यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले होते. आपल्या शासकीय सेवेदरम्यान त्यांनी आचरा, कनेडी शिरोडा,…

error: Content is protected !!