जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत निधी, श्राव्य, कृतिका यांचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत पेंडूर हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी निधी लक्ष्मण सरमळकर (इयत्ता-दहावी) हिने ट्राईम ट्रायल व मास स्टार्ट या दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. डॉन बास्को स्कुल ओरोसचा विद्यार्थी श्राव्य झाटये याने 14 वर्षाखालील गटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक तसेच वराडकर हायस्कूल कट्टाची कृतिका लोहार हिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. हे सर्व विद्यार्थी ब्युटीज ऑन व्हीलस ग्रुपचे सदस्य आहेत. या विद्यार्थ्यांची विभाग स्तरासाठी निवड झाली असून, प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक यांनी तसेच ब्युटीज ऑन व्हिलस च्या सदस्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!