मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा
आचरा (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या दुसऱ्या टप्प्या मधील स्पर्धेत चिंदर केंद्रात जिल्हा परिषद शाळा श्री भगवती विद्या मंदिर चिंदर भटवाडी शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला. चिंदर केंद्रात नऊ शाळा असून यामध्ये जिल्हा परिषद भटवाडी शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याच बरोबर भटवाडी शाळेची तालुका स्तरासाठी निवड झाली आहे. हे यश मिळवण्यासाठी शिक्षक निशिगंधा वझे, मैना कारंडे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष महेश कदम, शाळा व्यवस्था पण कमिटी, पालक, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. या यशा बद्दल गटशिक्षण अधीकारी संजय माने, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, पालक, ग्रामस्थ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.














